Wednesday, 23 September 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› भाजपची देशभरात प्रभारींची नवीन टीम; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडं मोठ्या राज्याची जबाबदारी› डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा› ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी› दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण› जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला› महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर› भाजपची देशभरात प्रभारींची नवीन टीम; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडं मोठ्या राज्याची जबाबदारी› डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा› ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी› दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण› जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला› महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर
Uncategorized

भाजपची देशभरात प्रभारींची नवीन टीम; विनोद तावडे, मेधा कुलकर्णींकडं मोठ्या राज्याची जबाबदारी

भाजपने संघटनात्मक पातळीवर (BJP) मोठे फेरबदल करत राज्य प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी मिळाली आहे. विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी, मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी आणि भारती पवार यांची गोव्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भागवत कराड यांच्याकडे मिझोरामच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या संघटनात्मक जबाबदारीतही मोठा बदल करण्यात आला आहे. बैजयंत जय पांडा यांची महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून अमित मालवीय, सदानंद तानावडे आणि कमलजीत सहरावत यांना सहप्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपच्या संघटनात्मक कामकाजासाठी नव्या नेतृत्वाची रचना करण्यात आली आहे.

भाजप लागला 2029 च्या तयारीला! पक्षसंघटनेत खांदेपालट, देशभरात प्रभारींची नियुक्ती, वाचा यादी

विनोद तावडे यांच्याकडे देशातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्यांच्या प्रभारीपदाकडे विशेष लक्ष आहे. त्यांच्यासोबत मेधा कुलकर्णी यांचीही सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भारती पवार यांच्याकडे गोव्याची आणि भागवत कराड यांच्याकडे मिझोरामची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, अमित मालवीय यांच्यावर महाराष्ट्राच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या आयटी सेलमधील त्यांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याच्या संघटनात्मक कामात भूमिका देण्यात आली आहे. एकाच वेळी महाराष्ट्रातील विनोद तावडे, मेधा कुलकर्णी, भारती पवार आणि भागवत कराड यांच्यासह इतर नेत्यांना वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आल्याने भाजपच्या नव्या संघटनात्मक फेरबदलात महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.