Tuesday, 22 September 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन› दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, पंचनामे उद्यापासून सुरू› आमदाराचे फ्लेक्स लावायला गुलाम झाले का? संतप्त शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर थोरातांचे खडेबोल› मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; 8 जिल्ह्यांत पावसाची किती तूट?, वाचा आकडेवारी› दुष्काळ कधी जाहीर होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिसूचनेबाबत मोठी घोषणा› दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय› विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन› दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, पंचनामे उद्यापासून सुरू› आमदाराचे फ्लेक्स लावायला गुलाम झाले का? संतप्त शेतकऱ्यांच्या आक्रोशानंतर थोरातांचे खडेबोल› मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; 8 जिल्ह्यांत पावसाची किती तूट?, वाचा आकडेवारी› दुष्काळ कधी जाहीर होणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिसूचनेबाबत मोठी घोषणा› दुष्काळ निवारणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन; मंत्रीमंडळाने घेतले महत्वाचे निर्णय
Uncategorized

विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन

राज्यातील वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. (Pandharpur) पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उद्यापासून सलग तीन दिवस भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता येणार नाही. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींच्या संवर्धनासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून रासायनिक लेपनाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामाची सुरुवात 22 सप्टेंबर रोजी शेजारतीनंतर होणार असून, त्यापूर्वी मूर्तींची आवश्यक सफाई आणि प्राथमिक प्रक्रिया केली जाणार आहे.

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची सातत्याने होत असलेली झीज हा गेल्या काही काळापासून चिंतेचा विषय ठरला होता. लाखो भाविकांकडून होणारा स्पर्श, चरणांवर टेकवले जाणारे मस्तक, अभिषेक तसेच तापमान आणि आर्द्रतेतील बदलांमुळे दगडाची झीज वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः विठ्ठलाच्या चरणांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने या भागाच्या संवर्धनावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. झिजलेल्या भागात मूळ दगडाशी सुसंगत दगडाची भुकटी वापरून आवश्यक भराव केला जाणार आहे.

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा, पंचनामे उद्यापासून सुरू

या रासायनिक लेपन प्रक्रियेला यापूर्वी काही भाविकांनी आक्षेप घेत न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे आषाढी यात्रेपूर्वी प्रस्तावित असलेले काम पुढे ढकलले गेले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने लेपन प्रक्रियेला परवानगी दिल्यानंतर कामाचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून मूर्तींच्या संवर्धनाचे काम हाती घेण्यात येत आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

मूर्तीची झीज थांबवणे, निर्माण झालेले तडे आणि खराब झालेले भाग सुरक्षित करणे तसेच मूर्तीचे दीर्घकालीन संरक्षण करणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. परंपरेत या प्रक्रियेला ‘वज्रलेप’ असे संबोधले जाते. मात्र, सध्याच्या संवर्धन पद्धतीत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मान्यताप्राप्त संरक्षक रासायनिक लेपाचा वापर केला जातो. दगडाची भुकटी, संरक्षक राळ आणि पाणीरोधक घटकांच्या माध्यमातून हे काम केले जाणार असून, प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.