Wednesday, 23 September 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा› ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी› दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण› जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला› महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर› विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन› डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा› ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी› दुष्काळाने शेतकरी हतबल; फडणवीसांच्या मिठीत बळीराजा ढसाढसा रडला, लातूर दौऱ्यात भावनिक क्षण› जात हा त्यांचा आवडीचा विषय, पण विद्यार्थ्यांनी… साहिल वाकोडे प्रकरणावरून राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका अन् विद्यार्थ्यांना सल्ला› महाराष्ट्रात दुष्काळसदृश्य परिस्थिती; फडणवीस-शिंदे आज शेतकऱ्यांच्या बांधावर› विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीन दिवस बंद; मूर्तींच्या संवर्धनासाठी आजपासून रासायनिक लेपन
Uncategorized

ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Uddhav Thackeray’s major demand : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्ञानेश कुमार यांचा विद्रूप, भीषण आणि विभत्स चेहरा जगासमोर आला आहे, अशा शब्दांत टीका करत त्यांना तातडीने अटक करून तुरुंगात टाकण्याची मागणी ठाकरे यांनी केली. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो, मात्र गेल्या काही वर्षांपासून देशात एक टोळी हैदोस घालत असून पक्ष फोडणे, पक्ष चोरणे आणि लोकशाहीचा खून करण्याचे काम या टोळीकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

ज्ञानेश कुमार यांच्यासह या कथित टोळीच्या प्रमुखालाही तुरुंगात टाकले पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली पाहिजे, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. ही टोळी नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर काम करत होती, हे आता जनतेला समजू लागल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोग गृहखात्याच्या सूचना मानत असल्याचे सांगत असेल, तर या सर्व प्रकाराचे सूत्रधार गृहमंत्री आहेत का, याचाही खुलासा झाला पाहिजे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसे आढळल्यास त्यांनाही योग्य ती शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

संकटात तुम्ही एकटे नाही, रडणाऱ्या शेतकऱ्याला फडणवीसांची मिठी, सरसकट मदतीची ग्वाही

निवडणूक आयोगाच्या निर्णयांचा पहिला आघात आपल्या शिवसेनेवर झाल्याचा आरोप करत ठाकरे म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकतर्फी निर्णय घेत शिवसेना हे नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार यांच्या पक्षाच्या बाबतीतही अशीच पद्धत अवलंबण्यात आली आणि आता तृणमूल काँग्रेसच्या बाबतीतही त्याच पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचा दावा ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपर्यंत जवळपास 45 लाख मतदारांची नावे यादीत वाढल्याचा दावा त्यांनी केला. आता त्याच मतदारांपैकी लाखो मतदारांच्या नोंदींवर SIR प्रक्रियेच्या माध्यमातून आक्षेप घेतले जात असल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांतील निवडणुका रद्द करून पुन्हा निवडणुका घेण्यात याव्यात आणि त्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेसचा गंभीर आरोप, ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी

निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप नोंदवल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोग मनमानी पद्धतीने चालवला जात असल्याचा आरोप करत, सत्तेच्या हव्यासातून लोकशाहीचा खून करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्यात यावी आणि यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि ताकद दाखवा, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.

या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत, आज मी सर्व विरोधी पक्षांना निमंत्रण देत आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन आता लढले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या मर्जीतील निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली तर ते नियुक्ती करणाऱ्यांच्या बाजूनेच काम करणार, असा आरोप करत हे करताना लोकशाहीच बुडवली जात असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.