दि. ३० : बीड जिल्ह्यात लाचखोरीने आता कहरच केला आहे. कोणतेही काम पैशाचे वजन ठेवल्याशिवाय होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी (दि. ३० जून) जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एकाच कारवाईत सहकार विभागातील तीन लाचखोरांना रंगेहात पकडले. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सावकारी परवाना देण्यासाठी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर १३ हजार रुपये स्वीकारताना सहायक निबंधक सूरज जगदाळे, कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने आणि खाजगी इसम महेश फपाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. माजलगाव येथील सहायक निबंधक कार्यालयात हा ट्रॅप करण्यात आला असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. Post navigation परळी वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित ३०१ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान सौरभ सोनवणेच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन