Saturday, 24 October 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› हा विकास आम्हाला मान्य नाही! कर्जतमधील वृक्षतोडीवरुन रोहित पवार आक्रमक, सरकारला केला थेट प्रश्न› तुकाराम मुंढेंच्या FDA ची केंद्राविरोधात हायकोर्टात धाव; अधिकार हिरावल्याचा गंभीर आरोप› इथेनॉल धोरणात बदल, साखर उद्योगासमोर नवं संकट; ऊसदरावर काय परिणाम होणार?› राजकीय वर्चस्व ते न्यायालयीन लढाई; भानुदास कोतकरांचा वादळी प्रवास संपला !› बीडच्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?› 500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल› हा विकास आम्हाला मान्य नाही! कर्जतमधील वृक्षतोडीवरुन रोहित पवार आक्रमक, सरकारला केला थेट प्रश्न› तुकाराम मुंढेंच्या FDA ची केंद्राविरोधात हायकोर्टात धाव; अधिकार हिरावल्याचा गंभीर आरोप› इथेनॉल धोरणात बदल, साखर उद्योगासमोर नवं संकट; ऊसदरावर काय परिणाम होणार?› राजकीय वर्चस्व ते न्यायालयीन लढाई; भानुदास कोतकरांचा वादळी प्रवास संपला !› बीडच्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?› 500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
Uncategorized

बीडच्या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; चौथी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

बीडच्या 4,791 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा (Beed) दिलासा, चौथी यादी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत 4,791 शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जाचा समावेश असून, सणासुदीच्या काळात त्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांशी संबंधित 3,145 आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1,646 शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायती, सेवा सहकारी संस्था आणि बँकांच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 4 हजार 61 थकीत कर्जदार शेतकऱ्यांची नावे कर्जमुक्तीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

या योजनेतील लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 58 हजार 598 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं असून, 45 हजार 463 शेतकऱ्यांची ही प्रक्रिया अद्याप बाकी आहे. पहिल्या दोन याद्यांनंतर पूर्ण झालेल्या प्रमाणीकरणाच्या आधारे शासनाने जिल्ह्यासाठी 918.56 कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापैकी राष्ट्रीयकृत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील 1 लाख 4 हजार 624 कर्जदारांच्या खात्यांवर 885.07 कोटी रुपये, तर बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 6,254 कर्जदारांच्या खात्यांवर 33.49 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

नव्याने प्रसिद्ध झालेल्या चौथ्या यादीत पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे. एकापेक्षा जास्त बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकी ग्राह्य धरली जाणार असून, 1 एप्रिल 2026 नंतरचं व्याज आणि इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांतील काही शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असली, तरी शासनाच्या हेअर कट धोरणानुसार संबंधित कर्ज निरंक करण्यात येणार आहे.

500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं; मनोज जरांगे पाटलांचा मोठा दावा

यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जावं. यादीतील आपला विशिष्ट क्रमांक देऊन विनाशुल्क ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावं. प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम थेट संबंधित कर्ज खात्यावर जमा केली जाणार आहे. ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांच्या बोटांचे ठसे उमटत नाहीत किंवा जे लाभार्थी मयत झाले आहेत, अशांसाठीही शासनाने 19 ऑगस्ट 2026 रोजी विशेष मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनाही नियमानुसार कर्जमुक्तीचा लाभ मिळू शकणार आहे.

चौथी यादी प्रसिद्ध झाली असली, तरी ती अंतिम यादी नाही. पहिल्या चार याद्यांमध्ये नाव न आलेल्या पात्र शेतकऱ्यांचा पुढील यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्याप नाव प्रसिद्ध झालेलं नाही म्हणून पात्र शेतकऱ्यांनी निराश होण्याची गरज नाही. त्यांनी आपली कर्ज थकबाकी तपासून आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि पुढील याद्यांवर लक्ष ठेवावं. आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली आहे, त्यांना नव्याने पीक कर्ज देण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सूचना देण्यात आल्या आहेत. उर्वरित 45 हजार 463 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी केलं आहे.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.