Monday, 21 September 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› 28 सप्टेंबरला शरद पवार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार परिस्थितीचा आढावा› मुंबईतील कबुतरखान्यांवरून संघर्ष तीव्र, मंगलप्रभात लोढा मुनी निलेशचंद्र महाराजांच्या निशाण्यावर› राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा› दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी› काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या ग्राऊंडवरचा नेता भाजपच्या गळाला, पक्षप्रवेश कधी?› एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार दोनशे व्होल्वो बस; लांबचा प्रवास होणार आरामदायी› 28 सप्टेंबरला शरद पवार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार परिस्थितीचा आढावा› मुंबईतील कबुतरखान्यांवरून संघर्ष तीव्र, मंगलप्रभात लोढा मुनी निलेशचंद्र महाराजांच्या निशाण्यावर› राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा› दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी› काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या ग्राऊंडवरचा नेता भाजपच्या गळाला, पक्षप्रवेश कधी?› एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार दोनशे व्होल्वो बस; लांबचा प्रवास होणार आरामदायी
Uncategorized

राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा

Mahesh Mote’s face was smeared with black substance : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर महेश मोटे याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अखेर जाहीर माफी मागितली आहे. काही दिवसांपूर्वी मोटे याने सोशल मीडियावर राज ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सोशल मीडियावरही या वक्तव्याची मोठी चर्चा झाली होती.

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर महेश मोटे पुण्यातील मनसे कार्यालयात पोहोचला. यावेळी त्याने राज ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य मागे घेत राज ठाकरे, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. यासंदर्भातील एक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर आला असून त्यामध्ये मोटे माफी मागताना दिसत आहेत. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलून माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्या चुकीबद्दल मी त्यांची माफी मागत आहे. मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही मी माफी मागतो, असे महेश मोटे याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याच्या नादात आपल्याकडून हे वक्तव्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.

मोटे याने आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही, अशी भूमिका मांडली. अनावधानाने राज ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे बोललो. रिल्सच्या नादात माझ्याकडून हे सर्व घडले. आता मी सर्वांची माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे. तसेच कोणाच्या नादी लागा, पण यांच्या नादाला लागू नका, असे वक्तव्यही मोटे यांनी या व्हिडीओमध्ये केले आहे.

सौदीवर हौथींच्या हल्ल्यांचा धोका वाढला, अमेरिकेकडून पश्चिम आशियासाठी ट्रॅव्हल अलर्ट जारी

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महेश मोटे याच्या चेहऱ्याला काळे फासलेले दिसत आहे. तसेच तो स्वतःची चप्पल डोक्यावर ठेवून उठाबशा काढताना दिसत आहे. त्यानंतर त्याने मनसेच्या शाखेत असलेल्या राज ठाकरे यांच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालत माफी मागितल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्यासारख्या व्यक्तीने सोशल मीडियावर उठून कोणाबद्दलही काहीही बोलणे योग्य नसल्याचे मोटे याने म्हटले आहे. आपल्या वक्तव्यामुळे मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दलही आपण माफी मागत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

दरम्यान, राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर महेश मोटे याच्याविरोधात मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर आता थेट पुण्यातील मनसे कार्यालयात जाऊन मोटे याने माफी मागितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे, माफी मागतानाचा संपूर्ण प्रकार व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्याने तो सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. राज ठाकरे यांच्याबाबत केलेले आधीचे वक्तव्य मागे घेत असल्याचे मोटे याने स्पष्ट केले असून, या प्रकारानंतर आता मनसेकडून या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतली जाते, याकडेही लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.