Monday, 21 September 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› 28 सप्टेंबरला शरद पवार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार परिस्थितीचा आढावा› मुंबईतील कबुतरखान्यांवरून संघर्ष तीव्र, मंगलप्रभात लोढा मुनी निलेशचंद्र महाराजांच्या निशाण्यावर› राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा› दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी› काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या ग्राऊंडवरचा नेता भाजपच्या गळाला, पक्षप्रवेश कधी?› एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार दोनशे व्होल्वो बस; लांबचा प्रवास होणार आरामदायी› 28 सप्टेंबरला शरद पवार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार परिस्थितीचा आढावा› मुंबईतील कबुतरखान्यांवरून संघर्ष तीव्र, मंगलप्रभात लोढा मुनी निलेशचंद्र महाराजांच्या निशाण्यावर› राज ठाकरेंबाबत वक्तव्य करणं पडलं महागात, महेश मोटेच्या चेहऱ्याला काळं फासलं, डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा› दुष्काळ जाहीर करा! विकासकामे थांबवून निधी शेतकऱ्यांकडे वळवा; रोहित पवारांची मागणी› काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेशाध्यक्षांच्या ग्राऊंडवरचा नेता भाजपच्या गळाला, पक्षप्रवेश कधी?› एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार दोनशे व्होल्वो बस; लांबचा प्रवास होणार आरामदायी
Uncategorized

दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक; वरुण सरदेसाईंचे विरोधकांना थेट आव्हान

Disha Salian Death Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील (Disha Salian) नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. सीबीआयने या प्रकरणात नव्याने एफआयआर दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्यासह काही नावांचा उल्लेख तपासाशी संबंधित कागदपत्रांत झाल्याचे वृत्त आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने पुरेसे पुरावे मिळेपर्यंत कोणालाही आरोपी मानू नये, असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणावरून दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण कधीही भेटलो नसल्याचे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांना 500 कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटीसही बजावली आहे.

दिशा सालियन मृत्यू प्रकरण; आदित्य ठाकरेंसह रिहा चक्रवर्ती, डिनो मोरियाचं FIR मध्ये नाव

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आरोप करणाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आरोप करणाऱ्यांनी एक तरी ठोस पुरावा समोर आणावा, असे त्यांनी म्हटले. पुरावे नसताना आरोप सुरू राहिल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल आणि आता फार काळ शांत बसणार नसल्याचा इशाराही सरदेसाई यांनी दिला.

दरम्यान, 500 कोटी रुपयांच्या मानहानीच्या नोटिशीमुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. सतीश सालियन हे त्यांच्या वकिलांसह मातोश्रीवर नोटीस देण्यासाठी पोहोचले होते. या नोटिशीत आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेत माफी आणि नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे. आता या नोटिशीला आदित्य ठाकरे काय उत्तर देतात आणि सीबीआयच्या तपासातून पुढे कोणते पुरावे समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.