Saturday, 24 October 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› 500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल› टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती; लाईव्ह बातम्या पाहून शुटर्स सावध› गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीआधी सतेज पाटलांची खेळी; संचालकांना पाठवले सहलीवर!› Rashibhavishya: 12 राशींसाठी कसा असेल शनिवार? पैसा, नोकरी, प्रेम आणि आरोग्याबाबत काय सांगतं राशिभविष्य? जाणून घ्या› मोठी बातमी! 500 कोटींच्या चर्चेत नवा ट्विस्ट! उदय सामंतांच्या विधानाने खळबळ› अहिल्यानगर हादरले ! 35 वर्षीय महिलेवर गोळीबार करून तरुणाने गोळी झाडून जीवन संपविले› 500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल› टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती; लाईव्ह बातम्या पाहून शुटर्स सावध› गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीआधी सतेज पाटलांची खेळी; संचालकांना पाठवले सहलीवर!› Rashibhavishya: 12 राशींसाठी कसा असेल शनिवार? पैसा, नोकरी, प्रेम आणि आरोग्याबाबत काय सांगतं राशिभविष्य? जाणून घ्या› मोठी बातमी! 500 कोटींच्या चर्चेत नवा ट्विस्ट! उदय सामंतांच्या विधानाने खळबळ› अहिल्यानगर हादरले ! 35 वर्षीय महिलेवर गोळीबार करून तरुणाने गोळी झाडून जीवन संपविले
Uncategorized

जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने महायुतीत ठिणगी, कदमांनी फोटो दाखवले, प्रसाद लाडांनी दिला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

Jarange’s ‘audio bomb’ sparks friction within the Mahayuti alliance : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेत 500 कोटी रुपयांच्या कथित प्रकरणाबाबत खळबळजनक आरोप केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्येच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी या प्रकरणावर भाष्य करताना मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात जवळीक असल्याचा दावा केला. आंदोलनादरम्यान दोघांच्या भेटीचे आणि एकत्र जेवतानाच फोटो देखील त्यांनी दाखवले. तसेच संबंधित ऑडिओ क्लिप एआयच्या माध्यमातून तयार केलेली नसून ती भाजपशी संबंधित असल्याचा आरोप देखील कदम यांनी केला.

रामदास कदम यांच्या या भूमिकेनंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी यांच्यासारखे वागू नये. कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायला हवी, असे लाड म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपण आणि शिवसेना नेते उदय सामंत सातत्याने चर्चा करत होतो, असे सांगत लाड यांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम रामदास कदम यांनी करू नये, असा इशारा दिला. अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होतं, बोलायचं का? – दरेकरांचा शिवसेना नेत्यांवर निशाणा

रामदास कदम यांच्या वक्तव्यांनंतर प्रश्न उपस्थित करत प्रसाद लाड यांनी, एकनाथ शिंदे यांना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनी घेतली आहे की काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडत असल्याचे म्हटले. एकनाथ शिंदे हे फक्त शिवसेनेचे नेते नसून महायुतीचे आणि भाजपचे देखील नेते आहेत, असे त्यांनी सांगितले. रामदास कदम हे देखील आमचे नेते आहेत, मात्र अशी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती, असे लाड म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप आपण मान्य करत नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांनी आपले नाव घेत आपण कुठे आहोत आणि भेटत का नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना, आपण सरकारच्या माध्यमातून मराठा समाजाचे काम करत होतो, मात्र दररोज जरांगे पाटील यांना भेटणे हे आपले काम नाही, असे स्पष्टीकरण प्रसाद लाड यांनी दिले. दरम्यान, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील रामदास कदम यांच्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. खालच्या पातळीवर आरोप केले जात असतील, तर भाजप गप्प बसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच; दुष्काळाचं मोठ संकट, सप्टेंबरमध्ये धक्कादायक आकडा

रामदास कदम प्रसाद लाड यांचे फोटो दाखवत असतील, तर काळकुटे यांचे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबतच अनेक होर्डिंग दिसतात, असे दरेकर म्हणाले. रामदास कदम यांना वाटत असेल की काहीही बोलले तरी चालेल, पण भाजपचे नेते लेचेपेचे नाहीत. आम्ही गप्प बसणार नाही आणि असे प्रकार खपवून देखील घेणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या, हे खपवून घेणार नाही, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेला वाद आता महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. या वादावर महायुतीचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि हा अंतर्गत संघर्ष कसा मिटवला जातो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.