500 कोटींच्या चर्चेवरून सुरू झालेल्या वादात आता फॉरेन्सिक तपासणीचा मुद्दा पुढे आला असून, उदय सामंत यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
500 Crore Controversy : मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपये घेतले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही त्यांना पैसे दिले नसल्याचं सांगितलं आहे. मग, या संवादात असा उल्लेख नेमका कोणी आणि कोणत्या कारणाने केला, याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली. संबंधित संवादाची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करण्याची मागणी आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली होती, असंही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी फॉरेन्सिक तपासणीची मागणी मान्य केली असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या प्रकरणाची सत्यता तपासातून समोर येईल, असं सांगत आता सर्वांनी या विषयावर पडदा टाकला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली.
जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने महायुतीत ठिणगी, कदमांनी फोटो दाखवले, प्रसाद लाडांनी दिला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा
देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होतं, बोलायचं का? – दरेकरांचा शिवसेना नेत्यांवर निशाणा
रामदास कदमांनी माझा नाद करू नये, मनोज जरांगेंचा घणाघात, व्हायरल ऑडिओ क्लिपवरून दिला थेट इशारा
500 कोटींच्या कथित व्यवहाराचा मुद्दा तापला; प्रसाद लाडांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाची फडणवीसांकडे धाव, सायबर चौकशी होणार!
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदेंवर निशाणा, गृहखात्याच्या चौकशीची मागणी
मोठी बातमी! 500 कोटींच्या चर्चेत नवा ट्विस्ट! उदय सामंतांच्या विधानाने खळबळ
डॉ. अभय फिरोदिया यांना प्रतिष्ठित ‘IOJ अहिंसा पुरस्कार’ प्रदान; लंडनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गौरव
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच; दुष्काळाचं मोठ संकट, सप्टेंबरमध्ये धक्कादायक आकडा
शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आळंदीत नांदी संमेलन; ग्रंथदिंडीसह विविध उपक्रमांचे आयोजन
अभिनेत्री राजश्री देशपांडे यांच्या पुढाकारातून वसंतनगर तांडा येथे ‘उमेद पशुधन आधार केंद्र’ सुरू
