Saturday, 24 October 2026 • ☀️ 28°C • अंशतः ढगाळई-पेपर   |   आजचा अंक   |   जाहिरात   |   संपर्क
ADVERTISEMENT
⚡ BREAKING NEWS
› 500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल› टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती; लाईव्ह बातम्या पाहून शुटर्स सावध› गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीआधी सतेज पाटलांची खेळी; संचालकांना पाठवले सहलीवर!› Rashibhavishya: 12 राशींसाठी कसा असेल शनिवार? पैसा, नोकरी, प्रेम आणि आरोग्याबाबत काय सांगतं राशिभविष्य? जाणून घ्या› मोठी बातमी! 500 कोटींच्या चर्चेत नवा ट्विस्ट! उदय सामंतांच्या विधानाने खळबळ› अहिल्यानगर हादरले ! 35 वर्षीय महिलेवर गोळीबार करून तरुणाने गोळी झाडून जीवन संपविले› 500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल› टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवी माहिती; लाईव्ह बातम्या पाहून शुटर्स सावध› गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीआधी सतेज पाटलांची खेळी; संचालकांना पाठवले सहलीवर!› Rashibhavishya: 12 राशींसाठी कसा असेल शनिवार? पैसा, नोकरी, प्रेम आणि आरोग्याबाबत काय सांगतं राशिभविष्य? जाणून घ्या› मोठी बातमी! 500 कोटींच्या चर्चेत नवा ट्विस्ट! उदय सामंतांच्या विधानाने खळबळ› अहिल्यानगर हादरले ! 35 वर्षीय महिलेवर गोळीबार करून तरुणाने गोळी झाडून जीवन संपविले
Uncategorized

देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होतं, बोलायचं का? – दरेकरांचा शिवसेना नेत्यांवर निशाणा

Pravin Darekar : मनोज जरांगे पाटील (Patil) यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच आता भाजपनेही या वादात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जरांगे यांच्या मुद्द्यावरून भूमिका मांडल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. महायुतीत एकत्र असताना मित्रपक्षातील नेत्यांवर आरोप करणं आणि भाजपसह देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणं खपवून घेतलं जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

जरांगेंना पडद्याआडून नेमकी कोणाची ताकद मिळत होती, याचाही शोध घेतला जाईल, असं दरेकर म्हणाले. फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी कोण कोण सहभागी होतं, हेही पुढे येईल, असा दावा त्यांनी केला. स्वतःच्या नेतृत्वाला खूश करण्यासाठी किंवा मुलाचं मंत्रीपद सुरक्षित ठेवण्यासाठी एखाद्या ज्येष्ठ नेत्याने वक्तव्यं करणं वेगळं; मात्र त्यासाठी भाजपला दोषी धरणार असाल, तर ते सहन केलं जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी रामदास कदम यांना सुनावलं.

देवेंद्रजींना संपवण्यासाठी जरांगेंना कोण ताकद देत होतं, बोलायचं का? ; दरेकरांचा शिवसेना नेत्यांवर निशाणा

शिंदेंना संपवण्याचा प्रयत्न भाजपमधील कोणत्या नेत्याने केला, हे कदम यांनी स्पष्ट करावं, असं आव्हानही दरेकर यांनी दिलं. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जरांगेंना कोणाकडून ताकद मिळत होती, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महायुतीतील नेत्यांनी एकमेकांशी बोलताना सभ्यता आणि सुसंस्कृतपणा जपायला हवा, असं सांगतानाच फडणवीस यांच्यावर यापूर्वी आरोप आणि कटकारस्थानं झाल्याचा दावा त्यांनी केला. शिंदेंवरील आरोपांची चौकशी व्हावी, अशी भूमिका असेल तर फडणवीस यांच्याबाबतीत घडलेल्या घटनांचीही चौकशी झाली पाहिजे, असं दरेकर म्हणाले.

दरम्यान, रामदास कदम यांच्या पूर्वीच्या भूमिकांचाही विचार केला पाहिजे, असं सांगत दरेकर यांनी त्यांच्यावर आणखी टीका केली. सुपारीबाजीच्या आरोपांचा उल्लेख करत या प्रकरणात कोण कोण सहभागी आहे, हे समोर येईल, असा दावा त्यांनी केला. कदम यांना सुपारीची भाषा चांगलीच अवगत असल्याचा टोला लगावत दरेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेला वाद आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

ही बातमी शेअर कराWhatsAppFacebookTelegramX

Netra Digital Pro साठी बातम्या व विशेष लेख.