01 Oct, 2023

‘लालबागचा राजा’च्या पायावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, शिव अनुयायांच्या अपमानामुळे मराठा समाज आक्रमक!

मुंबईः  सर्वात लोकप्रिय गणपती अशी ख्याती असलेला ‘लालबागचा राजा’ यंदा गणेशोत्सवाच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लालबागच्या राजाच्या गणपतीच्या पायावर बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा दाखवण्यात आली आहे. लालबागचा राजा गणेश मंडळाचा हा आगाऊपणा अनेकांना खटकला आहे. लालबागच्या राजाच्या पायावर शिवरायांची राजमुद्रा पाहून मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला असून लालबागचा राजा सार्वजनिक गणेश […]

1 min read

सगळे नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांना दुप्पट मदत केलीः मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. गेल्या वर्षभरात आम्ही सगळे नियम धाब्यावर बसवले. सगळ्या अटी-शर्ती धाब्यावर बसवल्या.एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवले आणि शेतकऱ्यांना दुप्पट मदत केली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरात केला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहण केल्यानंतर ते […]

1 min read

मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्याला नेमके काय मिळाले? वाचा जिल्हानिहाय सविस्तर घोषणा

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  मराठवाड्याचा कायापालट घडवणारा तब्बल ४६ हजार ५७९ कोटी ३४ लाख रुपयांचा संकल्प आज शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. यामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या सुधारित रक्कमेचा समावेश नाही. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे […]

1 min read

मराठवाड्यांसाठी ५९ हजार कोटींचे पॅकेज, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद):  मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी ५९ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ८ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली […]

1 min read

औरंगाबाद शहराबरोबच आता जिल्हा आणि विभागाचेही ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतर, उस्मानाबाद तालुका-जिल्ह्याचेही नाव बदलले!

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा निर्णय न्यायप्रविष्ठ असतानाच राज्य सरकारने आता औरंगाबाद शहराबरोबरच औरंगाबाद जिल्हा आणि औरंगाबाद विभागाचेही छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले आहे. उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्याचे नामांतरही धाराशिव करण्यात आले आहे. काल १५ सप्टेंबर रोजी राजपत्रात याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज शनिवारी […]

1 min read