पातूर | अज्ञात वाहनच्या धडकेत पती पत्नी गंभीर जखमी….उपचारादरम्यान पतीचा मृत्यू…
1 min read

पातूर | अज्ञात वाहनच्या धडकेत पती पत्नी गंभीर जखमी….उपचारादरम्यान पतीचा मृत्यू…

पातूर –

पातूर ते अकोला रोडस्थित असलेल्या सबस्टेशन जवळील उडानपुला समोर अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर बाईकस्वार पुंडलीक निमकांडे यांचा अकोल्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.पातूर पासून अकोल्याकडे जाताना सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशन जवळील उडानपुला समोर आज दि.17/09/2023 रोजी सुमारे 5:40 वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकी क्रमांक mh 30 AD 3054 ला धडक देऊन पळ काढला.सदर धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता.

सदर अपघाताच्या माहितीवरून पातूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता तिथे दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाल्याचे निदर्शनास आले असून आपल्या शेतातून दुचाकीने परत येत असलेले पती-पत्नी गंभीर अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले.

सदर घटनेची सविस्तर हकीकत अशी की, पातूर ते अकोला रोडवर असलेल्या उडान पुलासमोर एक अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार पती पत्नी घरी येत असतांना जबरदस्त धडक दिली. या धडकेत पुंडलीक नीमकांडे यांचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुचाकीच्या मागे बसलेली त्याची पत्नी रत्नाबाई निमकंडे गंभीर जखमी झाल्यात. ते दोघेही रस्त्यावर पडून होते तेव्हा 108 रुग्णवाहिकेचे चालक सचिन बारोकर यांच्या साहाय्याने दोघांनाही उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे हलविण्यात आले होते. यावेळी गंभीर जखमीना मदतीला पत्रकार दुले खा युसूफ खा सुरेंद्र उगले,मा. नगराध्यक्ष परशरम उंबरकर, गणेश उबरकर, राम उगले, वैभव गाडगे, रवी ढोकणे यांनी जखमी ला तात्काळ उपचारासाठी अकोला येथे रवाना केले असून सदर अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध व पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *