×
Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

गेवराई शहरांमध्ये तब्बल २० वर्षानंतर आज साजरी होणार दहीहंडी

 

गेवराई, महाराष्ट्र आरंभ वृत्त : धोंडराई गावच्या सरपंच कु. शितलताई साखरे यांच्या संकल्पनेतून गेवराई शहरांमध्ये तव्या २० वर्षांनंतर दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवाचे आयोजन शितलताई साखरे युवा मंच गेवराई यांच्याकडून करण्यात आले असून प्रमुख आकर्षक म्हणून सचिन नखडे मयुरी उत्तेकर कौस्तुभ गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहेतसेच विजेत्या संघाचा सम्मान करून त्यांना बक्षिसे ही दिली जाणार

आहेत. हा भव्य दिव्य असा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची आव्हान सरपंच कु. शितलताई साखरे युवा मंच यांच्याकडून करण्यात आले आहे.श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवगी तिथीला दहीहंडीचा सण साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीच्या एका दिवसानंतर येणारा हा सण भगवान कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून या सणाचे महत्त्व

आहे दही हंडी हा देशभरात साजरा केला जाणारा एक प्रसिद्ध हिंदू सण आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात हा दिवस दरवर्षी मोठया प्रमाणावर साजरा केला जातो हे कृष्ण जन्माष्टमीच्या दुसन्या दिवशी येते, ज्याला गोकुळाष्टमी असेही म्हणतात, जे भगवान कृष्णाच्या जन्माचे निरीक्षण करते. महाराष्ट्रात या कार्यक्रमाला गोपालकाला असेही म्हणतात. यावर्षी दहीहंडी मंगळवार, २७

ऑगस्ट रोजी आली होती तर जन्माष्टमी सोमवार, २६ ऑगस्ट रोजी होती. हा प्रसंग केवळ भगवान कृष्णाच्या आत्म्याचा उत्साही उत्सवच नाही तर सांधिक कार्याची आणि शारीरिक आव्हानाची परीक्षा देखील आहे. त्यामुळे या सणाला खूप महत्त्व आहे. गेवराई शहरांमध्ये पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा केला जात होता परंतु मधल्या काही काळात

हा उत्सव बंद पडला होता. आता धोंडराई गावच्या सरपंच कु. शितलताई साखरे यांच्या संकल्पनेतून गेवराई शहर मध्ये दहीहंडी उत्सव साजरा होत असून शितलताई साखरे बुवा मंच गेवराई यांच्याकडून या भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे दि. ३ सप्टेंबर मंगळवार रोजी सायं. ५ वा. बाजार तळ पोलीस स्टेशन जवळ गेवराई येथे आयोजन करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख आकर्षक म्हणून सचिन नरवडे मयुरी उत्तेकर कौस्तुभ गायकवाड यांची राहणार आहे

यावेळी विजेत्या प्रथम संघाला १.११.१११० बक्षीस तर व्दितीय संघाला ३३,३३३ रुबक्षी दिले जाणार असून राज्यातून जास्तीत जास्त दहीहंडी पथकाने सहभाग आपला सहभाग नोंदवावा व दहीहंडी उत्सवाचा लाभ घेऊन दहीहंडी पाहण्यासाठी मोठी गर्दी करावी असे आव्हान सरपंच कु. शितलताई साखरे युवा मंच यांच्याकडून करण्यात आले आहे.