×
Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळाप्रकरणी एकाला बीड पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात

बीड ( प्रतिनिधी ): महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणी एका आरोपीला बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. फसवणूक केल्या प्रकरणी काही ठेवीदारांनी त्यांच्या विरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. याच गुन्ह्यांप्रकरणी बीड पोलिसांनी यशवंत कुलकर्णी यांना पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.