×
Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

हा मोठा खेळाडू वडिलांना पाहू देत नाही क्रिकेट, भावही ठेवतात मॅचपासून दूर, कारण आहे धक्कादायक


पाकिस्तानच्या फास्ट बॉलरने खूप कमी वयात आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या गतीने आणि उत्कृष्ट लाईन-लेन्थने चांगल्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे, ज्यात विराट कोहली, रोहित शर्मा यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. नुकताच नसीम शाह याने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. नसीम शाह याने सांगितले की त्याचे वडील त्याचे सर्वात मोठे समर्थक आहेत, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो वडिलांना त्याचा एकही सामना पाहू देत नाहीत. नसीम शाह याने स्वतः असे का केले याचे कारण दिले आहे.

नसीम शाह याने सांगितले की, त्याच्या वडिलांनी प्रत्येक पावलावर त्याला साथ दिली आहे, पण तो त्यांना त्याचा एकही सामना पाहू देत नाही. नसीम शाह याने सांगितले की त्याच्या वडिलांची तब्येत ठीक नसते आणि प्रत्येक चेंडू पाहताना ते तणावग्रस्त होतात. नसीम शाह याने सांगितले की, त्याने आपल्या भावांनाही सांगितले आहे की, जेव्हाही पाकिस्तानचा सामना असेल, तेव्हा त्यांना टीव्ही पाहू देऊ नका. नसीम शाह याने सांगितले की, त्याला नेहमीच भीती वाटते की त्यांची तब्येत बिघडू शकते. नसीम म्हणाला की, जेव्हा तो पाकिस्तानकडून खेळतो, तेव्हा तो एक नाही, तर दोन सामने खेळतो.

नसीम शाह सध्या रावळपिंडीत असून बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार आहे. मात्र, पावसामुळे हा सामना सुरू झालेला नाही. रावळपिंडीतील मैदान ओले असल्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाहून गेला. नसीम शाहला घरच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करायची आहे, ज्यामुळे त्याचे वडील सामना पाहत असतील, तर त्याला आनंद होईल. नसीम शाहने त्याच्या पदार्पणाच्या मालिकेतच आई गमावली. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना त्याच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर त्याच्या वडिलांनी नसीमची काळजी घेतली, त्यामुळेच हा खेळाडू नेहमीच त्यांच्याबद्दल चिंतेत असतो.