Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

अज्ञान वाहानाच्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार

गेवराई – शेवगाव महामार्गावरील धोंडराईच्या रामनगर जवळील घटना!

गेवराई ( प्रतिनिधी ) : गेवराई – शेवगाव महामार्गावर अज्ञात वाहनाने समोरून दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवार (दि.२२) रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गेवराई तालुक्यातील धोंडराई च्या रामनगर जवळ घडली आहे. परमेश्वर आलू राठोड (वय ४०) असे अपघातातील मृताचे नाव असून ते तालुक्यातील राजपिंपरी तांडा येथील रहिवाशी आहे.

आपल्या एम.एच.१०.डी एन.८२१३ या दुचाकीवरून उमापूरकडून गेवराई कडे जात होता. यादरम्यान त्याच्या दुचाकीला अज्ञान वाहानाने समोरून जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान त्याचा मृतदेह एक तासभर रस्त्याच्या बाजूला पडून होता.

रस्तेच्या बाजूला एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे तेथील व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. यावेळी तेथे अपघातग्रस्त दुचाकीही (एम.एच. १० डी एन ८२१३) आढळून आली. त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती गेवराई पोलिसांना दिली. यानंतर जमादार दत्तु उबाळे हे घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. नेमका हा अपघात कसा झाला आणि कोणत्या वाहनाने धडक दिली  हे समजले नसून पुढील तपास चालू आहे