Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

बीड जिल्ह्यातून हद्दपार केलेले व्यक्ती परत बीड शहरात मिळुन आला

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई

 गेवराई (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे आदेशान्वये बीड शहर व जिल्ह्यामध्ये दरोडे,जबरी चोरी व इतर चोऱ्याला आळा बसण्यासाठी दि. 04/07/2024 रोजी रात्री 11.00 वाजेपासून बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलीस अधीक्षक बीड यांनी कोंम्बीग ऑपरेशन राबविण्याचे आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक दिनेश शाखा बीड येथे नव्याने रुजू झालेले उस्मान शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे व त्यांच्या पथकाला मालाविरुध्द व शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचे विरुद्ध कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने

दिनांक 05/07/2024 रोजी पोउपनि मुरकुटे व त्यांच्या टीमने कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाणे पेठबीड हद्दीत गस्त करत असतांना बीड जिल्हयातुन एक वर्षासाठी हद्दपार केलेला इसम नामे- जयदत्त नवनाथ पाटोळे रा.आयोध्या नगर पेठ बीड यास त्याचेविरूध्द पोलीस ठाणे शिवाजीनगर-08, बीड शहर-02 व पेठ बीड येथे-01 असे 11जबरीने मोबाईल चोरी केल्यावरून दाखल गंभीर गुन्हयामुळे बीड जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केलेला असताना तो सदर आदेशाचे उल्लंघन करुन आयोध्या नगर पेठ बीड येथे आला असल्याची गोपनिय माहिती स्थागुशा पथकाला मिळताच स्थागुशा पथकाने आयोध्या नगर पेठ बीड भागातून हद्दपार इसम नामे जयदत्त नवनाथ पाटोळे वय- 25 वर्षे रा.आयोध्या नगर पेठ बीड यास ताब्यात घेण्यात आले.सदर आरोपी ला पोलीस अधीनियम 1951चे कलम 55 प्रमाणे दिनांक 26/09/202023 रोजी हद्दपार नोटीस बजावण्यात आली होती.त्याने सदर आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याचे विरुध्द पो.ठ.पेठ बीड येथे पोलीस हवालदार विकास राठोड,स्थागुशा, बीड यांच्या फिर्यादीवरून कलम- 142 महाराष्ट्र पोलीस अधीनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कामगिरी मा.श्री. नंदकुमार ठाकुर पोलीस अधीक्षक,बीड, मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड, पोउपनि सिध्देश्वर मुरकुटै, सफौ/तुळशिराम जगताप, पोह/पी.टी.चव्हाण, राहुल शिंदे, विकास राठोड, बाळु सानप, चालक उलगे यांनी केली आहे.