वादळात सिमेंट काँक्रीटची कमान कोसळली; कारचा चुराडा, दोन अभियंता बालंबाल बचावले

[ad_1]

वादळात सिमेंट काँक्रीटची कमान कोसळली; कारचा चुराडा, दोन अभियंता बालंबाल बचावल

अंबाजोगाई – तालुक्यातील पूस येथून अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. रविवारी (दि.२६) दुपारी अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यात चक्क रोडवरील सिमेंट काँक्रीटची कमान जमीनदोस्त झाली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.पूसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथील सुप्रसिद्ध पद्मावती देवी मंदिराची स्वागत कमान असून ती सिमेंट काँक्रीटची आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्याच्या जोराने ही कमान कोसळली. यावेळी कमानीखाली उभ्या असलेल्या कारवर (टीएस ०८ एचएम ०२०९) कमान कोसळल्याने कार अक्षरशः चपटी झाली आहे. सुदैवाने सदरील कारमधील अभियंता जी. अजयकुमार आणि ए. व्यंकटेश हे दोघे चहा पिण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये गेले असल्याने ते बचावले. हे दोन्ही अभियंता लातूर-परळी महामार्गाच्या कामावर रुजू असून ते हैदराबाद येथून पुसला येऊन परळी रोडवरील डांबर प्लांटकडे निघाले होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून आज ते बचावले अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *