राजहंस मिशन 50-L’ अंतर्गत 50 लिटर दूध देणाऱ्या गायी निर्मितीचे उद्दिष्टे : रणजितसिंह देशमुख

[ad_1]

संगमनेर : माजी कृषी मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते  आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात दुधाळ गायींची निर्मिती करून अधिकाधिक दूध देणार्‍या गाईंची संख्या वाढविणे व त्यातून आर्थिक समृध्दी करणे गरजेचे आहे, असे विचार संगमनेर दूध संघाचे चेअरमन मा. रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केले.

राजहसं मिशन 50-L अंतर्गत रायतेवाडी, ता. संगमनेर येथील शरद दत्तात्रय मंडलिक यांचे मुक्त संचार गोठाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र पा. चकोर,संचालक विलासराव कवडे, प्र्रमोद पावसे, शॅम्प्रोचे संचालक तान्हाजीराव आहेर, गरूड कुक्कुपालन संस्थेचे संचालक गणपतराव बांगर, सुभाष पाटील गुंजाळ, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. विजय कवडे, दूध संकलन अधिकारी भाऊसाहेब आहेर,केंद्राधिकारी विजय पावसे आदी उपस्थित होते.

यावेळी देशमुख पुढे म्हणाले की, दूध संघाने ‘राजहंस मिशन 50-L’ अंतर्गत 50 लिटर दूध देणाऱ्या गायी निर्मितीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यासाठी गोठा , आहार, आरोग्य व प्रजनन व्यवस्थापन या बाबीवर शास्त्रीय पध्दतीने काम केले जात आहे. त्यातुनच अधिक दूध देणार्‍या गायींची निर्मिती केली जाणार आहे. दुग्धव्यवसायामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबुत झाली आहे. दुग्धव्यवसाय अधिक किफायतशीर करावयाचा असेल तर दुग्धव्यवसायात अत्याधुनिकता आणली पाहिजे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. मुक्त संचार गोठा ही अत्याधुनिक संकल्पना आहे, मुरघास, सेक्स सॉर्टेड सिमेन इत्यादींचा अवलंब दूध उत्पादकांनी केला पाहिजे. थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सन 1977 साली दूध संघाची स्थापना केली. त्यांच्या आदर्श विचारावर या संघाची वाटचाल चालू आहे. पारदर्शक व चांगल्या कामातून राज्यात हा दूध संघ आदर्श ठरला आहे.

माजी महसुलमंत्री मा. आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला आधिक स्थिरता निर्माण करण्यासाठी दूध संघ कटीबध्द असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले. संघाने दूध उत्पादकांना जनावरासांठी स्वस्त दरात औषधे मिळावीत यासाठी तालुक्यात ठिकठिकाणी राजहंस मेडीकल सुरू केलेले आहे. शेतकरी व दूध उत्पादकांना ही औषधी कमी किंमतीत व तात्काळ उपलब्ध होत असल्याने जनावरांचा आजारावरील खर्चात व वेळेतही बचत होते. राजहंस दूध संघाने राज्यात प्रथम आर.टी.पी.सी.आर. टेस्ट सुरू केली असून त्यातून मस्टायटिस व गोचिड तापाचे अचून निदान होणार आहे. अचूक निदान झाल्यास योग्य तो औषधोपचार करणे सोपे होते. दूध संघाने दूध उत्पादकांना सवलतीच्या दरात प्रत्येक टेस्टसाठी रूपये 725/- इतका खर्च निश्‍चित केलेला आहे. ही टेस्ट संघामार्फत केल्यामुळे 4 तासातच आजाराचे निदान करून उपचार करता येतात. त्यामुळे दूध उत्पादकांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होणार आहे. त्यामुळे संघात होणारी ही आर.टी.पी.सी.आर. टेस्ट ही दूध उत्पादकांना अधिक किफायतशीर ठरेल.

यावेळी शॅम्प्रोचे संचालक तान्हाजी आहेर, दूध संघाचे संचालक विलासराव कवडे, प्रमोद पावसे, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी आपले विचार मांडले. यावेळी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय पावसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद मंडलिक यांनी केले.


दुधाचा चहाच आरोग्यवर्धक 

सध्या कोरा चहा पिण्याची फॅशन सुरू झालेली आहे. ग्राहक हा दूधाच्या चहाऐवजी कोरा चहाची मागणी करत आहे. त्यामुळे दुधाची खपत कमी होत आहे. मात्र कोऱ्या चहा ऐवजी दुधाचा चहा आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे सर्वांनी दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा असे अवाहनही रणजितसिंह देशमुख यांनी केले.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *