[ad_1]
रमा गिरी यांचे प्रतिपादन; माऊली नर्सिंगमध्ये शपथग्रहण सोहळा
बीड / प्रतिनिधी
नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी मोठ्या प्रमाणात आहेत. आता नवीन अभ्यासक्रमामुळे हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी परदेशातही सक्षमपणे रुग्णसेवा करु शकतात असे प्रतिपादन जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन रमा गिरी यांनी केले.
बीड शहरातील धानोरा रोडवर असलेल्या माऊली नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचा शपथग्रहण सोहळा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गिरी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ.अजय विघ्ने, डॉ.वर्षा तिडके, रंजना मॅडम, संस्थेचे सचिव डॉ.महादेव मुंडे, प्रा.संगीता मुंडे, दत्तात्रय चोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन करुन फलोरेन्स नाईटींगेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर विद्यार्थीनींना शपथ देण्यात आली. यावेळी बोलतांना रमा गिरी म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी नर्सिंग क्षेत्रात करिअर करतांना समर्पण भावना ठेवणे आवश्यक आहे. या क्षेत्रात तुम्हाला तुमच्या करिअरबरोबरच रुग्णसेवेलाही तेव्हढेच महत्त्व द्यावे लागणार आहे. आज विविध क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. नर्सिंग क्षेत्रही याला अपवाद नाही. असे असतांनाही आरोग्यविषयक विविध सेवांमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. यातही आता नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी परदेशातही चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकतात असे गिरी यांनी सांगितले. यावेळी डॉ.अजय विघ्ने, डॉ.वर्षा तिडके, डॉ.महादेव मुंडे, प्रा.संगीता मुंडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य पोपळे, धनंजय मेडकर सर, शुभम जोगदंड, किरण वडमारे मॅडम, आदिंसह विद्यार्थी-विद्यार्थीनींची उपस्थिती होती.
[ad_2]