सुरेश कुटे यांना पोलीस संरक्षण, गुन्हे दाखल होऊन ही अटक नाही! परळी येथे राजस्थानी मल्टीस्टेट चंदुलाल बियाणी यांच्या सह १७ संचालकांवर गुन्हे दाखल. –

[ad_1]

सुरेश कुटे यांना पोलीस संरक्षण, गुन्हे दाखल होऊन ही अटक नाही!

 परळी येथे राजस्थानी मल्टीस्टेट चंदुलाल बियाणी यांच्या सह १७ संचालकांवर गुन्हे दाखल.

बीड- 90 हजार ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये आपल्याच कंपन्यांना कर्ज स्वरूपात घेऊन जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा अपहार करणाऱ्या सुरेश कुठे यांना पोलीस संरक्षण कोणाच्या आदेशावरून दिले गेले अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज असताना गुन्हे का दाखल केले गेले नाहीत कुठे हे पोलीस प्रशासनाचे जावई आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचे सर्वसामान्यांचे मत झाले आहेबीड शहरासह संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मध्ये तब्बल 51 शाखांच्या माध्यमातून 3000 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक व्यवहार असणारी ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था ऑक्टोबर 2023 रोजी कुठलेच ठोस कारण न देता अध्यक्ष सुरेश कुटे यांनी बंद केली त्यामुळे दहा हजार रुपयांपासून दहा कोटी रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या हजारो ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळालेगेल्या आठ नऊ महिन्यात सुरेश कुटे यांनी अनेक वेळा फेसबुक लाईव्ह करून तुम्ही पाणी होऊ नका असं म्हणत ठेवीदारांना वेगवेगळ्या तारखा दिल्या मात्र एक छदामही ठेवीदारांच्या खात्यावर जमा झाला नाही .तिरुमला समूहावर इन्कम टॅक्स च्या धाडी पडल्यामुळे ज्ञानराधा अडचणीत आल्याचे कारण देत कुटे यांनी वेळकाढूपणा केला.या दरम्यान अनेक ठेवीदारांच्या घरात लग्नकार्य,मेडिकल इमर्जन्सी आली पण पैसे काही मिळाले नाहीत.अनेकांनी गेवराई, माजलगाव,बीड शहर,पेठ बीड,बीड ग्रामीण यासह अनेक पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दिले.मात्र पोलिसांनी या ठेवीदारांना हुसकावून लावले.अनेकांनी एसपी नंदकुमार ठाकूर यांच्याकडे तक्रारकेली,मात्र त्यांनीही गुन्हा दाखल करून घेण्यास सांगण्याऐवजी ठेवीदारांची समजूत काढण्याचा अन त्यांना कायद्याचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला.सुरेश कुटे यांनी सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक केली आहे हे धडधडीत दिसत असताना सुद्धा पोलिसांनी त्यांना संरक्षण देत ग्राहकांना वाईट वागणूक दिली आहे.कोणत्याही पोलीस ठाण्यात 25 लाख रुपयांपर्यंत अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मर्यादा आहे,मात्र त्यावरील रक्कमेचा अपहार असल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रकरण पाठवले जाते असे पेठबीड पोलीस ठाण्याचे प्रमुख मुदिराज यांनी सांगितले, मात्र दुसरीकडे परळी पोलिसात तब्बल साडेसात कोटींच्या फसवणूक प्रकरणी चंदूलाल बियाणी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याचाच अर्थ पोलीस कुटे यांना देऊन घेऊन सहकार्य करत असल्याची चर्चा सुरू आहे.

तर परळी येथे चंदुलाल बियाणी यांच्या सह १७ संचालकांवर गुन्हे दाखल.

ठेवीदारांच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर आज पहाटे २.४७ वाजता राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह १७ संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यां विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मल्टीस्टेटचे परळी मुख्यालय असताना देखील गुन्हा होत नसल्याने तमाम ठेवीदारात संताप व्यक्त होत होता. उशिरा का असेना पोलिसांना जाग आली अन् भल्या पहाटे परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेली अनेक महिन्यांपासून राजस्थानी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह अख्ख संचालक मंडळ ठेवीदारांचे जवळपास ३०० कोटी बुडवत परळीतील मुख्य शाखेसह सर्व शाखा बंद करून पोबारा केल्याची संताप जनक घटना घडली. यामध्ये ज्या ठेवीदारांनी चंदुलाल बियाणी आणि संचालक मंडळावर मोठा विश्वास ठेवून भविष्यात आपल्या दवाखाना, लग्न समारंभ, मुलांचे शिक्षण, व्यवसाय, शेती आदीसाठी पैसा कामी येईल आणि महिन्यांचा खर्च व्याजाच्या स्वरूपात उचलून आपला उदरनिर्वाह भागवावा ह्या उद्देशाने लाखो रुपयांच्या ठेवी राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह मध्ये ठेवल्या. मात्र आपला अव्वाच्या सव्वा खर्च ठेवीदारांच्या पैशातून केल्यामुळे राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह डबघाईला आली परिणामी ठेवीदारांचे पैसे बुडण्यात जमा झाले. आपला मेहनतीचा पैसा बुडण्याच्या स्थितीत आल्यामुळे तमाम ठेवीदारांमध्ये मोठ्या संतापाची लाट उसळली आणि आपल्या पैशांच्या मागणीसाठी राजस्थानी मल्टीस्टेटच्या शाखेत चकरा खेटा मारण्यास प्रारंभ केला तरी देखील चंदुलाल बायाणी यांच्यासह अख्ख्या संचालक मंडळ ठेवीदारांचे पैशे देण्यासाठी असमर्थ ठरलं नंतर मात्र मुख्य शाखेसह सर्व शाखांना कुलूप लावीत सर्वचजण फरार झाले. ठेवीदारांनी चंदुलाल बियाणी यांच्यासह मल्टीस्टेटचे इतर संचालक अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र बऱ्याच महिन्यांपासून ते फोन उचलत नसून नॉट रिचेबल आहेत परिणामी दिवसेंदिवस ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळत गेली. परिणामी आज पहाटे २.४७ वाजता बिभीषण मानाजी तिडके राहणार नेहरू चौक यांच्या फिर्यादीवरून ७,५३,२९,९६८/- रकमेसाठी परळी शहर पोलीस ठाण्यात गु र नंबर ७४/२०२४ दिनांक २४/५/२०२४ रोजी कलम ४०६, ४०९, ४२०, १२० बी, सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ कलम ३ नुसार चंदुलाल बियाणी यांच्यासह बालचंद्र लोढा, अभिषेक बियाणी,बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल, विजय लड्डा, अशोक जाजू, सतीश सारडा, प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी,नामदेव रोडे, जगदीश बियाणी, व्ही बी कुलकर्णी, कांबळे मॅडम, तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी व इतर सोसायटीचे अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला. ठेवीदारांच्या बऱ्याच प्रतीक्षेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल झाला मात्र प्रत्यक्षात पोलीस आरोपीवर कधी कठोर कारवाई करतात याकडे ठेवीदारांचे लक्ष लागून आहे.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *