Our website is made possible by displaying online advertisements to our visitors. Please consider supporting us by whitelisting our website.

येणार अक्षय कुमार-सुनील शेट्टीच्या ‘धडकन’ चित्रपटाचा सीक्वल ? जाणून घ्या दिग्दर्शकाने काय माहिती दिली

[ad_1]


असे काही चित्रपट आहेत, ज्यांची कथा, पात्रे आणि गाणी लोकांच्या मनात वर्षानुवर्षे घर करून राहतात. असाच एक चित्रपट आहे – ‘धडकन’, ज्याचे दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केले होते. हा चित्रपट 2000 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसले होते. अक्षयने रामची भूमिका, सुनीलने देव आणि शिल्पाने अंजलीची भूमिका साकारली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता पुन्हा एकदा याबाबतची माहिती समोर आली आहे.

अलीकडेच, बॉलीवूड हंगामासोबतच्या संभाषणात धर्मेश दर्शनने ‘धडकन 2’ बद्दल सांगितले की, हा चित्रपट पहिल्या भागाचा सिक्वेल असेलच असे नाही. आधुनिक चित्रपटसृष्टीनुसार, हा एक ताजा चित्रपट देखील असू शकतो. दिग्दर्शनाच्या दुनियेत परतण्याचा त्याचा काही विचार आहे का, असे जेव्हा त्याला विचारण्यात आले. यावर तो म्हणाला, जर सिनेमाला माझी गरज असेल, तर मी नक्कीच करेन.

अक्षय, सुनील आणि शिल्पा शेट्टीशिवाय या चित्रपटात महिमा चौधरी, शर्मिला टागोर, किरण कुमार यांसारखे स्टार्स होते. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की तो बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला. हा पिक्चर ब्लॉकबस्टर ठरला. अहवालानुसार, चित्रपटाचे बजेट 9.50 कोटी रुपये होते आणि जगभरात 26.47 कोटी रुपये (एकूण) कमावले होते.

अनेक वर्षांनंतरही देव, राम आणि अंजली ही पात्रे लोकांच्या मनात आहेत. या चित्रपटात अनेक गाणी होती जी प्रचंड हिट झाली. जसे- ‘दुल्हे का सेहरा’, ‘तुम दिल की धडकन’, ‘दिल ने यह कहा है दिल से.’ ‘दुल्हे का सेहरा’ हे गाणे इतके लोकप्रिय झाले होते की हे गाणे जवळपास प्रत्येक लग्नात वाजवले जाते. या चित्रपटात सुनील शेट्टीची भूमिका ‘ग्रे शेड’ प्रकारातील होती आणि त्या भूमिकेसाठी त्याला ‘नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा’ फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *