जिवाचीवाडी तलावातील नितीन काळे यांचा मृतदेह तलावात फुगून २४ घंटेनंतर वर आला.स्थानिक मच्छिमारांन तलावा बाहेर काढला.

[ad_1]

जिवाचीवाडी तलावातील नितीन काळे यांचा मृतदेह तलावात फुगून २४ घंटेनंतर  वर आला

स्थानिक मच्छिमारांन तलावा बाहेर काढला.

येवता दि.२४केज तालुक्यातील जिवाची वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत दि.२३- गुरुवारी दुपारी १२ वाजता मासे धरण्यासाठी गेले नितीन मच्छिंद्र काळे वय-३४ वर्ष यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना पोहता येत होते!परंतू ते मासे पकडण्यासाठी पोहत जाताच त्यांचा मृत्यू झालेचे प्रथम समयी माहिती वरून दिसून आले.मृत्तदेह शोधन्यासाठी परळी-वै.येथील बचावकार्य पथकास पाचारन केले.परंतू २३ तासा नंतर नितीन काळे यांचा मृतदेह आपोआप तलावातील पाण्यात फुगून वर आल्याचे दिसताच येथील स्थानीक मासेमारी करनारे पांडुरंग मारूती चुंबळे व बचावकार्य पथक यांनी मृतदेह पाण्यातुन बाहेर काढला,केज पोलीस स्टेशन अंतर्ग विडा बिटचे राजु वंजारे व शेख समीन पाशा यांनी प्रेताचा पंचनामा केला,यावेळी गुरूवार रात्री पासुन  केज तहसीलदार अभिजीत जगताप चार तास घटनास्थळी तळ ठोकून होते. त्यांच्या सोबत तलाठी उत्तरेश्वर घुले,ग्रामविकास अधिकारी महिंद्र मुंडे,शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नंतर प्रेत ग्रामीण रुग्णालय,विडा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले व दुपारी ठिक ०३:०० वाजता त्यांच्या मुळ गावी जिवाची वाडी येथील शमशानभुमी येथे संत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी,मुलगी-१,मुलगा-१,आई, वडील असा परिवार आहे.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *