बीड जिल्ह्याला झाल काय रोज एक लाचखोर जाळ्यात.दोन आठवड्यात 9 जणांविरुद्ध कारवाई. ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. –

[ad_1]

बीड जिल्ह्याला झाल काय रोज एक लाचखोर जाळ्यात.दोन आठवड्यात 9 जणांविरुद्ध कारवाई.

३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. 

बीड जिल्ह्याला लागलेल्या लाचखोरीच्या ग्रहणाचा भांडाफोड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांकडून करण्यात आला. गेल्या आठवड्यात नववा अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केलेल्या निलंबीत पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याला न्यायालयातून बाहेर आणताना मल्टीस्टेटमधील ठेवीदारांनी हरिभाऊ खाडे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या.

गेल्या आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ जणांना अटक केली होती. आता शुक्रवारी धाराशिवच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा कामगार अधिकारी दिनेश राठोड यास ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

महामंडळाच्या एका कर्मचाऱ्याला माजलगावला नियुक्ती देण्यात आली. मात्र, सदर कर्मचारी रुजू न झाल्याने त्याच्यावर कार्यालयीन ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी परिवहन महामंडळातील (ST) कामगार अधिकारी दिनेश राठोड याने ७० हजार रुपयांची लाच मागून 60 हजार रुपयांत तडजोड केली. यातील 30 हजार रुपये घेताना तो शुक्रवारी चतुर्भुज झाला.

दरम्यान, जिजाऊ माँसाहेब मल्टीस्टेटच्या प्रकरणात एका व्यवसायिकाला आरोपी करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची लाच मागून 30 लाख रुपयांत तडजोड करुन एका व्यवसायिकाच्या हाताने पाच रुपये घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला आर्थिक गुन्हा शाखेचा

निलंबीत व फरार असलेला पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे गुरुवारी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला. त्याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या घरातून नगदी रक्कम, सोने, चांदी असे दोन कोटींहून अधिक रकमेचा ऐवज व मालमत्तांची कागदपत्रे आढळल्याने त्यास सात दिवसांची कोठडीची मागणी तपास अधिकारी व लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांनी न्यायालयासमोर केली

जिल्हा व सत्र न्यायाधीश (पाचवे) एस. एस. डोके हरिभाऊ खाडे यास सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याला न्यायालयातून कोठडीत नेत असताना ठेवीदारांनी मुर्दाबाद, मुर्दाबाद, पैसे घेणाऱ्या खाडेचा धिक्कार असो, अशा घोषणा दिल्या.

शेतकऱ्यांकडून लाच घेतल्यावरून गुन्हा नोंद झालेला कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर, बीडमध्ये अकृषी परवान्यासाठी लाच घेताना अटक झालेले निलेश सोपान पवार व नेहाश शेख अब्दुल गणी हे देखील पोलिस कोठडीत आहेत. दरम्यान, हरिभाऊ खाडेच्या लाच प्रकरणातील याच शाखेतील फौजदार रविभूषण जाधवर मागच्या बुधवारपासून फरारच आहेत. तर, बुधवारी अकृषी परवान्यासाठी सहकारी खासगी अभियंत्यांमार्फत लाच स्विकारल्यावरुन गुन्हा नोंद झालेला नाही. दुसरीकडे नगरचनाकार प्रशांत डोंगरे हा देखील अद्याप फरार आहेत.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *