दुष्काळ व दुष्काळ सदृश्य स्थितीबाबत सूचना

[ad_1]

बीड / प्रतिनिधी
जिल्हयामध्ये जून ते सप्टेबंर 2023 या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची परिस्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपतीची शक्यता विचारात घेवून शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. 31 ऑक्टोबर 2023 दि. 16 फेब्रुवारी 2024 व 11 नोव्हेंबर 2023 अन्वये वडवणी, धारुर आणि अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ व बीड जिल्हयातील बीड, गेवराई, शिरुर, माजलगाव, केज, परळी, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करुन विविध सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

      बीड जिल्हयामध्ये आवश्यक तेथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टॅकरव्दारे करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार टँकर मंजूरीचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. पाणीटंचाईच्या अनुषंगाने टँकर मंजूरीबाबत काही अडचण असल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाशी व पाणी टंचाईविषयी काही तक्रार, अडचण असल्यास कार्याकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद बीड तथा नोडल अधिकारी पाणी टंचाई यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हयात कोठेही जनावरांच्या चा-याबाबत टंचाई भासत असेल तर डॉ. आर. डी. कदम, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्कासाठी दुरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड दुरध्वनी क्रमांक 02442-299299, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, बीड,भ्मणध्वनी क्र. 8668381215,उपविभागीय अधिकारी कार्यालय,बीड, (बाळू घोलप) 9922846465, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाटोदा (बाबर शेख) 9970665115, उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव, (गणेश जवादे) 9767754501, उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई (सुर्यकांत गायकवाड) 9970895622, उपविभागीय अधिकारी परळी (बी.एल. रुपनर )9422930542 आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, कार्यालय बीड दूरध्वनी 0244-297022 यावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी केले आहे.
नियंत्रण कक्ष क्रमांक कार्यान्वित
        
“अपत्कालीन परिथ्सतीच्या वेळीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षास कळविण्यासाठी जिल्हयातील सर्व जनतेस नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02442-299299 तसेच पोलीस विभागाशी संपर्क साधण्यासाठी टोलफ्री क्रमांक 100 आणि अग्निशामक विभागाचा टोलफ्री क्रमांक 101, अपत्कालीन सेवा ॲम्बुलन्स 108 अपत्कालीन परिस्थितीमध्ये या क्रमांकावर संपर्क साधवा, असे जिल्हा अपत्ती व्यावस्थापन प्राधिकारण, आपत्ती व्यवस्थापन शाखा यांनी कळविले आहे”

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *