जटाशंकर मंदिरातील शिवमहापुराण कथेत शिव – पार्वती सोहळा, शिवभक्त झाले वऱ्हाडी

[ad_1]

बीड शहरातील जटाशंकर मंदिरात रविवार १९ मे २०२४ पासुन संभाजीनगर येथील कथाकार  सौ.वसुंधरा श्रीपाद पाठक यांच्या शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञास सुरूवात झाली आहे. दररोज  दुपारी ४ ते सायंकाळी  ६ यावेळेत शिवमहापुराण कथेस भाविकांची गर्दी होत आहे. गुरूवारी कथाकार  वसुंधरा पाठक यांनी  समुद्र मंथन कथा, अमृत लक्ष्मी उत्पत्ती, निलकंठेश्वर भगवान ,नर्मदा मय्या उगम ,सती चरित्र, सतीचे यज्ञकुंडात समर्पण, पार्वती जन्म , पावर्ती तपस्या, शिव पावती विवाह कथा सांगीतली. शेकडो भाविकांनी या कथेचा लाभ घेतला . विवाह सोहळ्यांनतर साडेसात वाजता  सामुदायीक आरती करण्यात आली. यजनाम  गणेश कडेकर, कल्याण मुळे, दिनकर कुलकर्णी  यांच्यासह भाविक  मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
सायकांळी सात वाजता शिवपार्वती सोहळा
जटाशंकर मंदिरात शिवमहापुराण कथेत  सायंकाळी सात वाजता शिव-पार्वती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येला सवाद्य  शिव वरात काढण्यात आली. ही वरात कथास्थळी येताच भाविकांनी शिव-पावर्तीचे जोरदार  स्वागत केले. बृम्हवृंदांच्या उपस्थीतीत मंत्रोच्चारात हा  शिव पार्वती विवाह सोहळा पार पडला.या कथेच्या दरम्यान भगवान  शिवाची वेशभुषा कु. आर्या मकरंद कुलकर्णी, तर  पार्वतीची वेशभुषा  कु. ईश्वरी दिनेश  लिंबेकर या मुलींनी साकारली होती.
आज रिध्दी-सिध्दी गणेश विवाह
जटाशंकर मंदिरात आज शुक्रवार २४ मे रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत   रिध्दी सिध्दी गणेश विवाह ,तुलसी उत्पत्ती, त्रिपुरा सुर दहन, तुलसी गंगा उत्पती, या कथा होणार आहेत.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *