अक्षता शेटे हीचे 12 वी परिक्षेत यश

[ad_1]

अक्षता शेटे हीचे 12 वी परिक्षेत यश
 
बीड / प्रतिनिधी

येथील अक्षता अक्षय शेटे हीने बारावी परिक्षेत यश मिळवले आहे. या परिक्षेत 93.83% मार्क्स मिळवून ती दयानंद कॉलेज, लातूर 12 वी सीए फ ाऊंडेशन बॅच मधून मेरिट मध्ये आली. बीड जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अशोक शेटे यांची ती नात असून रोटरी चे माजी अध्यक्ष व कर सल्लागार अक्षय शेटे यांची ती कन्या आहे.

तिने आयसीएससी दहावी परीक्षेत देखील उत्तुंग यश मिळवले होते. तिने लातूर येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालय मध्ये वाणिज्य सीए फ ाऊंडेशन बॅच येथे प्रवेश घेऊन हे यश मिळवले. तिला भविष्यात सीए व्हायचे आहे. त्या साठी तिने दहावी पासूनच याची तयारी सुरू केली आहे.तिच्या या यशाबद्दल दयानंद कॉलेज, लातूर चे ट्रस्टी संजय बोरा, प्राचार्य सौ.अंजली बुरांडे, सर्व प्राध्यापक तसेच सर्व मित्र मंडळी कडून तिचे व शेटे परिवाराचे अभिनंदन होत आहे.

[ad_2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *