बीड: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये अनेक विविध मारहाणीचे घटनांतील व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाले. त्यानंतर मात्र बीडमध्ये किती दहशत आहे याचा महाराष्ट्राने पाढाच वाचला. आता व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तरुणावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. जो कोणी मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल करेल त्या व्यक्तीला देखील आरोपी करण्यात येईल असा पवित्र बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून समाज माध्यमावर वायरल करण्याचा ट्रेंड बनला आहे. या माध्यमातून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र आता असे व्हिडिओ चित्रित करून व्हायरल करणारे बीड पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. जो व्यक्ती हाणामारीचे व्हिडिओ चित्रित करून वायरल करेल त्याला देखील आरोपी करणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात वादविवाद होतात. हत्या खून किरकोळ मारामाऱ्या देखील आपण पाहत आलोयत. मात्र बीड मधील सतत होत असलेले व्हायरल व्हिडिओ त्यामुळे बीडची बदनामी मोठी झाली आहे. व्हायरल व्हिडिओ समाज माध्यमात फिरतात आणि बीडमध्ये किती दहशतवाद ठासून भरलाय, याची प्रचिती येते. पोलीस अधीक्षकांनी घेतलेल्या या निर्णयावर बीडच्या नागरिकांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तमाम महाराष्ट्रात गाजले. या प्रकरणानंतर अनेक वायरल व्हिडिओने अक्षरश: धुमाकूळ घातला. यामुळे नागरिक देखील मोठ्या दहशतीत राहिले. पोलिसांनी घेतलेला हा निर्णय समाजाभिमुख असल्याचे बीडचे तरुण सांगतात.
बीडची गुन्हेगारी पाहता गृह विभागाने नवनीत काँवत या तरुण आयपीएस अधिकाऱ्याला बीडच्या पोलिस अधीक्षक पदाची धुरा सोपवली गेली. त्यानंतर मात्र पोलीस अधीक्षकांनी अनेक गॅंगवर मकोकासारख्या कायद्याअंतर्गत कारवाई करत बीडचं दूषित झालेलं वातावरण सावरण्याचा प्रयत्न केलाय. आता चक्क व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावरच कारवाईचा बडगा उगारल्यामुळे हाणामारीच्या घटना आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला रोख बसणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.