[ad_1]
इंदापूर (प्रतिनिधी ): इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचा, खाजगी शाळेचा, कुठली शाळा असला तरी तिचा सोमवारी पहिला दिवस होता आणि पहिल्याच दिवशी इंदापुर तालुक्यातील पिटकेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा वडाच्या झाडाखाली भरली.नागरिकांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केल्या. गेले कित्येक वर्ष झालं शिक्षण विभाग इंदापूर यांच्या सोबत पाठपुरावा करतोय,कोणीच लक्ष देत नाही.इंदापूर तालुक्याला आतापर्यंतच्या कालखंडात तत्कालीन गटविकास अधिकारी शिक्षणाधिकारी किंवा आताचे शिक्षण विभाग, गटविकास अधिकारी यांना जनतेच्या सार्वजनिक, जिव्हाळ्याच्या, अतिशय किचकट समस्यावर प्रश्नावर रस नाही.राजकीय पुढाऱ्याच्या मागं पुढे करण्यामध्ये आणि इतर गोष्टीत त्यांना जादा रस आहे.आमदार व मंत्री यांच्या दिमाखित या अधिकाऱ्याला मागेपुढे करण्यात किंवा हेच आमदार किंवा हेच मंत्री आपल्यासारख्या तोऱ्यात वावरतात.
सविस्तर हकीगत अशी की, इंदापुर तालुक्यातील पिटकेश्वर गावातील जिल्हा परिषद शाळेचा जिल्हा शाळेचा पहिला दिवस होता आणि शाळा झाडाखाली भरवण्यात आली कारण की, गेली कित्येक वर्ष शाळेच्या खोल्यासाठी, वर्गासाठी ग्रामस्थ मागणी करतात पण नुसती टोलवाटोलवी आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.नागरिकांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केल्या. गेले कित्येक वर्ष झालं शिक्षण विभाग इंदापूर यांच्या सोबत पाठपुरावा करतोय,कोणीच लक्ष देत नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी निमगाव केतकी परिसरतील माजी सभापती पंचायत समिती इंदापूर यांच्या जागरण गोंधळासाठी एका पुढाऱ्याला येता आले नाही पण दुसऱ्या दिवशी खुरमुंडी खायला आवर्जून दुसऱ्या दिवशी ते पुढारी आले. एका ग्रामस्थ यांनी नांव न छापण्याच्या अटीवर सांगितले.त्यावेळेस पिटकेश्वरांच्या ग्रामस्थांनी त्यांना विचारलं की, शाळेची खूप दुरावस्था झालेली आहे, जरा खाली उतरून बघा तर हे पुढारी म्हणाले की, माझा प्रोटोकॉल नाही किंवा प्रोटोकॉलच्या विरोधात आहे.
एवढे हे मोठे जनतेचे सेवक इंदापूर तालुक्याला कोट्यावधी रुपयाचा निधी दिला म्हणून गावभर गेली दहा वर्ष दिंडोरा पिटवत आहेत. त्याची काय? त्या विकास कामाची काय? दुरवस्था आहे पहिल्या पावसाने केली आहे ते तालुका बघत आहे.लोकांची, जनतेचे मतदान चालतात ,पावसाळ्यात जर मतदान असलं तर चिखलात, पाण्यात गाडी त्या मतदाराला टाकून आणून मतदान घेतलं जातं. साधं गाडीतून दोन पावलं उचलून शाळा पाहू शकले नाहीत का? असा पिटकेश्वरांच्या ग्रामस्थांचा सवाल आहे.ग्रामस्थांमध्ये खूप नाराजगी आहे.
विद्यार्थी या चिमुकल्या सुद्धा प्रतिक्रिया खूप जिव्हाळ्याच्या आहेत. सदरची शाळा पडून एका चिमुकला विद्यार्थ्यांचा तीन ठिकाणी हात मोडलेला आहे याला जबाबदार कोण?
इंदापूर तालुक्यात असाच एकदा शाळेचा प्रश्न रेडा गावात निर्माण झाला होता. त्यावेळेस गावकऱ्यांना आंदोलन केलं होतं. आणि हे आंदोलन मोडून काढण्यासाठी त्यावेळीच शिक्षणाधिकाऱ्यांनी गावकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली होती. हे जनतेचे सेवक आहे का? जनता यांची सेवक आहे हे समजायला मार्ग नाही.
पिटकेश्वर जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न तात्काळ प्रशासने महिन्याभराच्या आत बांधकाम पूर्ण करून सोडवावा. तालुक्यात अनेक गावात शाळेचे अशी अवस्था आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या, पाचवी पर्यंतच्या शाळेमध्ये संडास बाथरूमची सोय नाही.लहान लहानशा विद्यार्थ्यांची मुलींची बाथरूम नसल्याने त्यांची कुचंबांना, मानहानी होते. शिक्षक, शिक्षका सांगतात की, आम्ही वारंवार पाठपुरावा करतो पण आम्हाला वरून प्रशासन साथ देत नाही.
काही गावात सार्वजनिक कामात काम करणाऱ्या दानशूर व्यक्ती,माजी विद्यार्थी ह्या तिथे संडास बाथरूम बांधत असतात. त्याची दुरावस्था गावातील नाहक मंडळी करतात. टाकीतून पाणी तिथून नेहणे, नळ मोडणे, जाळ्या तोडणे, त्या संडास बाथरूम मध्ये दारूच्या बाटल्या टाकणे, शिक्षकाला दमदाटी करणे अशा खोडसाळपणा करतात.अशा लोकांनी सुद्धा कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि इंदापूर तालुक्यातील हायस्कूल असतील , जिल्हा परिषद शाळा असेल, जिल्हा परिषद शाळा येथे संडास बाथरूम तात्काळ पंधरा दिवसाच्या आत बांधावे अशी लोकांकडून मागणी होत आहे.
एकंदरीत काय की, पिटकेश्वर ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय, ग्रामस्थ म्हणतात की, जर आम्हाला शाळा तात्काळ बांधून नाही दिली किंवा याची दखल नाही घेतली तर आम्ही अधिकाऱ्याला तालुक्यातून फिरु देणार नाही. पुढाऱ्यांना सुद्धा आम्ही तालुक्यात फिरवून देणार नाही. सार्वजनिक ,सामाजिक कार्यक्रमात बहिष्कार टाकू, शाळा बंदच ठेवू, याकडे प्रशासन कसे लक्ष देईल,राज्य सरकार कसं बघेल ,इंदापूर तालुक्यातील आजी-माजी मंत्री कसे पाहतात. याकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
[ad_2]