[ad_1]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेत मध्यस्थी केली आणि युद्धबंदी शक्य केली. यावेळी त्यांनी पुन्हा व्यापऱ्याचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, ट्रम्प यांच्या अशा प्रकारच्या दाव्यांचे भारताने खंडन केले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात १० मे रोजी झालेला युद्धबंदी करार दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यातील थेट संपर्कातून झाला होता. मात्र, ट्रम्प असे द्यावे करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी (२५ जून) नेदरलँड्समधील हेग येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेत पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी इस्रायल-इराण युद्ध आणि रशिया-युक्रेन युद्धासह जगभरातील अलीकडील लष्करी संघर्षांचा उल्लेख केला, परंतु त्यापैकी सर्वात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान संघर्ष होता, जो त्यांनी संपवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत दावा केला की त्यांच्या फोन कॉलमुळेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मी ते फोन कॉल्सच्या मालिकेने संपवले आणि म्हटले की जर तुम्ही एकमेकांशी लढलात तर आपण कोणताही व्यापार करार करणार नाही. जनरल (असीम मुनीर) खूप प्रभावी होते. पंतप्रधान मोदी माझे खूप चांगले मित्र आहेत, ते एक उत्तम सज्जन आहेत. ट्रम्प म्हणाले की, जर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर अमेरिका व्यापार करार करणार नाही. यावर दोघांनीही अमेरिकेसोबत व्यापार करार करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे आम्ही अणुयुद्ध थांबवले, असे ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी स्थापित करण्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांतच ट्रम्प यांनी असा दावा केला आहे.
[ad_2]